नवी दिल्ली – सण आणि सुट्ट्यांमुळे डिसेंबरमध्ये सरकारी आणि खासगी बँका १४ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सुट्ट्यांचे दिवस पाहून बँकेतील कामे उरकावी लागणार आहेत.
३ डिसेंबरला गोव्यात बँकांना सुट्टी आहे. ४ डिसेंबरला रविवारची सुट्टी आहे. ५ डिसेंबरला गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी अहमदाबादमधील बँकांना सुट्टी आहे. १० डिसेंबरला दुसरा शनिवार आणि ११ डिसेंबरला रविवार असल्यामुळे सलग २ दिवस देशातील बँका बंद राहणार आहेत. १२ डिसेंबरला शिलॉंगमध्ये बँका बंद राहतील. १८ डिसेंबरला रविवार आहे. १९ डिसेंबरला गोवा लिब्रेशन डे निमित्त पणजीत बँका बंद राहतील. २४ डिसेंबरला ख्रिसमस निमित्त शिलॉंगमध्ये बँका बंद असतील.२५ डिसेंबरला रविवार आणि २६ डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी आहे. २९ डिसेंबरला गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त चंदीगडमध्ये बँकांना सुट्टी आहे. ३० डिसेंबरला शिलॉंगमध्ये बँका बंद राहतील. ३१ डिसेंबरला नववर्षाच्या पूर्वसंध्येला बेलापूरमध्ये बँकांना सुट्टी आहे.