क्वालालंपूर- सुधारणावादी नेते अन्वर इब्राहिम यांची मलेशियाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मलेशियाच्या राजे सुलतान अब्दुल्ला अहमद शाह यांनी ही घोषणा केली आहे. देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली होती. मलेशियामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे सरकार स्थापनेवर प्रश्नचिन्ह होते. मात्र मलेशियाचे राजे सुलतान अब्दुल्ला अहमद शाह यांनी अन्वर इब्राहिम यांची मलेशियाने नवे पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. अन्वर इब्राहिम मलेशियाचे दहावे पंतप्रधान आहेत.