सुरक्षा रक्षकाने अडवल्याने स्मृती इराणी संतापल्या, द कपिल शर्मा शोचे शुटींग केले रद्द

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लिहिलेल्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी त्या द कपिल शर्मा शोमध्ये आल्या होत्या. मात्र त्यांना सेटवरील सुररक्षा रक्षकांनी ओळखले नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले. मात्र त्याच वेळी सेटवर झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी बॉयला गार्डने कोणतीही चौकशी न करता आत सोडले. यामुळे संतापलेल्या स्मृती इराणी शूटिंग न करताच परतल्या. जेव्हा कपिल आणि त्याच्या प्रॉडक्शन टीमला याची माहिती मिळाली तेव्हा सेटवर एकच गोंधळ उडाला. प्रॉडक्शन टीमने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. पण अखेर शूटिंग रद्द करावे लागले. त्यानंतर मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी तेथे आले. त्यांनी कपिलच्या प्रोडक्शन टीमशी बराच वेळ संवाद साधला, अशी माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांचा ड्रायव्हर आणि दोन लोकांची टीम संध्याकाळी शोच्या शूटिंगसाठी कपिल शर्माच्या सेटवर पोहोचली होती. प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांनी त्यांना ओळखळे नाही आणि त्यांना आत जाऊ दिले नाही. स्मृती इराणी यांनी त्याला सांगते की त्यांना सेटवर एपिसोड शूट करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यावर सुरक्षा रक्षक इराणी यांना म्हणाला की , ‘आम्हाला कोणताही आदेश मिळालेला नाही, माफ करा मॅडम, तुम्ही आत जाऊ शकत नाही. स्मृती इराणी यांनी बराच वेळ गार्डला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने इराणी यांना आत सोडले नाही. तेवढ्यात झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आला. तो कलाकारांसाठी फूड पॅकेट देण्यासाठी आत आला होता. गार्डने त्याला काहीही न विचारता सोडले. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी खूप संतापल्या. अखेर नाराज होऊन स्मृती इराणी शूटिंग न करताच परतल्या. ज्यांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले त्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी होत्या हे सुरक्षा रक्षकाला समजल्यावर त्याने घाबरून सेटवरून पळ काढला. त्याने आपला फोनही बंद केले आहेत .

तर प्रॉडक्शन टीम सतत स्मृती इराणी यांच्याशी संपर्क करण्याचा पर्यंत करत आहे. स्मृतीचा एपिसोड शूट होऊ शकला नसला तरी, मंगळवारी सनी देओल आपला मुलगा करण देओलच्या आगामी ‘वेले’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या सेटवर शूट करण्यासाठी पोहोचला. त्याचा एपिसोड शूट झाला. आता स्मृती इराणी यांच्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी वाचक आणि दर्शकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. स्मृती इराणी यांनी ‘लाल सलाम’ हे थ्रिलर पुस्तक सत्य घटनेवर लिहिले असून हे पुस्तक पूर्ण करण्यासाठी त्यांना सुमारे 10 वर्षे लागली आहेत. वेस्टलँड पब्लिशिंग कंपनीचे हे पुस्तक २९ नोव्हेंबरला बाजारात येणार आहे.अशी माहि

Close Bitnami banner
Bitnami