सुरत – व्हॅलेंटाईन डे अगोदरच एक खळबळजनक अशी घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमामधून तरुणाने तरुणीची निर्घृण पणे हत्या केली आहे. भरदिवसा तरुणीचा गळा चिरला आहे. ही संपूर्ण घटना मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुरतमधील कामरेज येथे पसोदरा येथे ही धक्कादायक घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरतमधील कामरेज येथील ही घटना आहे. एका तरुणाने भरदिवसा तरुणीचा गळा चिरून तिचा निर्घृणपणे खून केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणीचा पाठलाग करत होता. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी तरुणीच्या काकांनी या तरुणाला खडसावले सुद्धा होते. घटनेच्या दिवशी या तरुणाने या तरुणीच्या घराबाहेर जाऊन गोंधळ घातला. यानंतर एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या या तरुणाने प्रेयसीच्या भाऊ आणि वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर मैत्रिणीच्या गळ्यावर चाकू ठेवून या तरुणीला घराबाहेर काढलं. मग भरदिवसा सर्वांसमोर या तरुणाने त्या तरुणीचा गळा चिरला.
यानंतर एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या या तरुणाने प्रेयसीच्या भाऊ आणि वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. यानंतर मैत्रिणीच्या गळ्यावर चाकू ठेवून या तरुणीला घराबाहेर काढले होते. ज्यावेळी या तरुणाने तरुणीला पकडून तिच्या गळ्याजवळ चाकू धरला होता. त्यावेळी ही तरुणी मदतीकरिता आरडाओरड करत होती. या तरुणाला समजावण्याचा शेजाऱ्यांनी प्रयत्न केला होता. पण एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या या तरुणाने अखेर तिचा गळा चिरला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.