संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

सेना भवनजवळच्या वास्तू सेंटरमध्ये शिंदेगटाचे मध्यवर्ती कार्यालय !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- शिवसेनेतून फुटलेला एकनाथ शिंदे गटचा शिवसेनेबरोबर टोकाचा संघर्ष आणि स्पर्धा सुरु आहे. एकनाथ शिंदे गटाने आता त्यांचे मध्यवर्ती कार्यालयही शिवसेना भवनाच्या अगदी जवळच घेण्याचे ठरवले आहे. शिवसेनाभवन पासून सुमारे ५०० मीटरच्या अंतरावर असलेल्या कासारवाडीतील वास्तू सेंटर या इमारतीत शिंदे गटाने नवे कार्यालय घेण्याची तयारी सुरु केली आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हे कार्यालय असेल. सेनाभवन जवळ कार्यालय घेण्यासाठी शिंदे गटाकडून अनेक जागांची पाहणी केली होती. त्यानंतर वास्तू सेंटर इमारतीची जागा जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami