मुंबई- दिवाळीच्या शुभमुहूर्तावर काल मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली होती. त्यानंतर आज घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 287 अंकांची घसरण झाली. तर निफ्टीमध्ये आज 74 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.48 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,543 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.42 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,656 अंकांवर पोहोचला. शेअर बाजार बंद होताना सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजार सुरू झाला त्यावेळी सेन्सेक्स 20 अंकांनी वधारत 59,852.13 अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 12.80 अंकांच्या तेजीसह 17,743.55 अंकांवर व्यवहार करत होता.