मुंबई – आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार बंद झाला. सेन्सेक्स 235 अंकांनी वाढून 61,185 च्या पातळीवर बंद झाला आणि निफ्टी 85 अंकांच्या उसळीसह 18,202 च्या पातळीवर बंद झाला. आज ब्रिटानिया, एसबीआय, अदानी एंटरप्रायझेस, बीपीसीएल आणि आयशर मोटार हे सर्वाधिक वाढले. दिवी लॅब्स, एशियन पेंट्स, सिप्ला, सन फार्मा आणि अदानी पोर्ट्सला सर्वाधिक घसरण झाली. ब्रिटानियाने 8.43 टक्क्यांनी झेप घेतली.
नोव्हेंबर रोजी शेअर बाजाराच्या निर्देशांकांमध्ये वारंवार बदल होत होता. आज शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली, पण थोड्याच वेळात सेन्सेक्सने 400 अंकांची वाढ गमावली आणि निफ्टीनेही जवळपास 80 अंक गमावले. मात्र, बाजार बंद होताच पुन्हा एकदा निफ्टी आणि सेन्सेक्स त्यांच्या सुरुवातीच्या जवळपास बंद झाले. बँकिंग क्षेत्रात तुलनेने चांगली कामगिरी केली.