संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

सेबीचा ‘टी प्लस वन’ नियम लागू; शेअर्सचे पैसे २४ तासांत मिळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सेबीने आजपासून ‘टी प्लस वन’ सेटलमेंट पद्धत सुरू केली आहे. याचा फायदा शेअर्सची खरेदी-विक्री करणाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेअरचे पैसे २४ तासांत बँक खात्यात जमा होणार आहेत. यापूर्वी शेअर्स विक्रीचे पैसे खात्यात जमा होण्यासाठी ४८ तास लागत होते. त्यामुळे ट्रेडर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘टी प्लस वन’ ही पद्धत सेबीने शुक्रवार, २५ फेब्रुवारीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सुरुवातीला १०० कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश करून अशाप्रकारे सेटलमेंट केले जाईल. त्यानंतर पुढील महिन्यापासून दर शुक्रवारी ५०० कंपन्या ‘टी प्लस वन’ पद्धतीशी जोडल्या जातील. यामुळे पैसे मिळण्याचा कालावधी ५० टक्‍क्‍यांनी कमी होणार असल्यामुळे शेअर बाजारात ६०० कोटी अधिक गुंतवले जाऊ शकतील, अशी अपेक्षा सेबीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव अग्रवाल यांनी व्यक्त केली. यापूर्वी ४८ तासांनी पैसे खात्यात जमा होत होते. परंतु आता ते २४ तासांत जमा होणार असल्यामुळे सेटलमेंटमध्ये पैसे अडकण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढेल, असे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami