दिल्ली – हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. त्याचा मोठा आर्थिक फटका अडानी समूहाला बसला होता. परिणामी अब्जाधीशांच्या टॉप टेन यादीतून गौतम अदानी बाहेर फेकले गेले होते.पण या प्रकरणी आता सेबीच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे . गुंतवणूकदारांचे संरक्षण आणि बाजारातील व्यवहारांचे नियमन करणाऱ्या सेबी सारखया संस्थेत अदानी यांचे नातेवाईक असल्या मुळेच सेबी या प्रकरणाकडे डोळेझाक करीत असल्याचा गंभीर आरोप तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी म्हटले की, दिग्गज वकील सिरील श्रॉफ यांचा मी आदर करते. मात्र, त्यांच्या मुलीचा विवाह गौतम अदानींच्या मुलासोबत झाला आहे. श्रॉफ हे सध्या कॉर्पोरेट गर्व्हर्नेंस अॅण्ड इनसायडर ट्रेंडिग बाबतच्या सेबीच्या समितीवर आहेत. जर, सेबी अदानी प्रकरणाची चौकशी करत असेल तर श्रॉफ यांनी सेबीच्या त्या समितीवरून तात्काळपणे पायउतार झाले पाहिजे, असेही मोइत्रा यांनी सांगितले. महुआ मोइत्रा यांनी सेबीचे प्रमुख माधबी पुरी बुच यांना पत्र लिहून अदानी समूहाच्या संस्थांवरील नियामकांच्या चौकशीबाबत माहिती मागितली होती.