संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

सैफ अली खानची बिल्डर विरोधात तक्रार तब्बल ७ कोटी रूपयांची केली मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या वादग्रस्त ‘आदिपुरुष ” या आगामी चित्रपटातील रावणाच्या भूमिकेला सोशल मीडियावरून खूप विरोध होत आहे.अनेकांनी त्याला यासाठी ट्रोल केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील सैफचा लूक वादाचा विषय ठरला आहे.त्यातच आता सैफ अली खानने बिल्डरच्या वागण्याच्या कंटाळून सैफ अली खानने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.तसेच त्याने या बिल्डरकडे ७ कोटी रुपयांची रक्कम नुकसान भरपाई म्हणून मागितली आहे.
सैफ अली खानने मिडसिटीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर तीन कमर्शिअल अपार्टमेंट खरेदी केले होते. या फ्लॅट्सची किंमत ५३.३४ कोटी रुपये एवढी असल्याचे बोलले जात आहे.२०१९ च्या जून महिन्यापर्यंत या अपार्टमेंटचे काम त्याने पूर्ण करून मागितले होते.परंतु बिल्डरने हे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे सैफ वैतागला आणि त्याच्या विरोधात महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अर्थोरिटी विभागात तक्रार दाखल केली आहे.तसेच सैफने या बिल्डरकडून जवळपास ७ कोटी रुपये नुकसान भरपाई आणि त्यावर १८ टक्के जीएसटीची देखील मागणी केली आहे. बिल्डरने हे अपार्टमेंट २०१९ पर्यंत बनवून देण्याची हमी दिली होती. परंतु त्याने हे काम वेळेत पूर्ण नाही केले. एकीकडे सैफ अली खानने आपली बाजू मांडली आहे. तर दुसरीकडे बिल्डरचे म्हणणे आहे की, सैफ अली खानने या अपार्टमेंटसाठी कोणतंही पेमेंट केलेले नाही किंवा अपार्टमेंट घेण्यासाठी कोणतीही रुची दाखवलेली नाही.सैफला अपार्टमेंट्स तयार झाल्याची माहिती देण्यात आली होती,असे बिल्डरचे म्हणणे आहे. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर अर्थोरिटने सैफ आणि बिल्डरला अंशतः दिलासा दिला आहे.
दरम्यान, नुकताच सैफ अली खानचा विक्रम वेध हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसला होता,मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यासोबतच आगामी काळातसैफ अली खानचा आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.याचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे तर यात तो रावणाची भूमिका साकारत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami