संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

सोनाली फोगाट हत्या प्रकरणी पुन्हा धक्कादायक माहिती उघड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पणजी – भाजपच्या नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाटाच्या हत्या प्रकरणातील खुलासांची मालिका सुरु असून त्यांच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाल्यानंतर आता सोनालींच्या सिक्रेट लॉकर्सचा आरोपीला थेट ॲक्सेस होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे. यामुळे आरोपीची नजर सोनालींंच्या संपत्तीवर होती,असा पोलिसांचा अंदाज आहे.

सोनाली फोगाट यांचा जवळचा सहकारी असलेला आणि त्यांच्या हत्येचा प्रमुख सुत्रधार असलेला आरोपी सुधीर संगवान जो सध्या तुरुंगात आहे. त्याला सोनाली फोगाट यांच्या सिक्रेट लॉकर्सचा ॲक्सेस होता. सोनाली यांचं इलेक्ट्रॉनिक लॉकर पासवर्डविना अनलॉक करण्यात अपयशी ठरल्यानंतर पोलिसांनी हे लॉकर सील केले आहे. तसेच सोनाली यांच्या तीन डायऱ्याही पोलिसांना सापडल्या आहेत. या घटनेनंतरच 23 ऑगस्ट रोजी सकाळी 42 वर्षीय सोनाली फोगाट या त्यांच्या हॉटेलमध्ये कोसळल्यानंतर त्यांना गोव्यातील अंजुना येथील सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami