संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

सोनिया गांधी यांना
ईडीचे पुन्हा समन्स

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवले आहेत. 21 जुलै रोजी ईडीने सोनिया गांधी यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. याआधीही सोनिया गांधी यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र सोनिया गांधी यांना कोरोना झाल्यामुळे त्या दिल्लीतील रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यामुळे त्या चौकशीसाठी हजर राहू शकल्या नाहीत. त्यांची चौकशीही पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीकडून सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा 21 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता सोनिया गांधी चौकशीला जाणार का? आणि कॉँग्रेस नेते, कार्यकर्तेे पुन्हा आक्रमक होणार का? याकडे सर्वार्ंचे लक्ष लागले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami