आज मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये सोन्याचा दर काहीसा कमी झाला आहे. तर चांदी स्थिर आहे.
महत्त्वाचे म्हणजे सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. तसेच तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील तणाव व डॉलरच्या तुलनेत रुपयातील कमजोरी हे सोन्याचे भाव वाढण्यामागील कारण आहे. परंतु रशिया आणि युक्रेनमधील तणाव अगदी काही प्रमाणात कमी झाल्याने देशांतर्गत आणि परदेशी बाजारात नफा-वसुली झाली. अशा परिस्थितीत सोन्याची ही वाढ कायम राहणार की नाही याकडे गुंतवणुकादारांचे लक्ष आहे. सध्या सोने दर 50000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.