नवी दिल्ली – कर्ज घेणे जेवढे सोपे आहे, तेवढेच ते न फेडणेही तितकेच त्रासदायक असते. त्यात कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात अनेकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेकांना सोने घाण ठेऊन बँकांकडून कर्ज काढले होते. मात्र आता ते कर्ज फेडणे शक्य ना झाल्यामुळे आता बँका आणि एनबीएफसी अशा सुमारे १ लाख कुटुंबांच्या सोन्याचा लिलाव बुधवारी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
खरं तर, मुथूट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्स, ज्यांची गोल्ड लोन मार्केटमध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी असून, यांच्याकडून सोन्यावर सर्वाधिक कर्ज घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून कर्जाची परतफेड केलेल्या डिफॉल्टर्सच्या सोन्याचा लिलाव करण्यास सांगणाऱ्या नोटिसा जारी केल्या आहेत. या बुधवारपासून लिलावाचा पहिला टप्पा सुरू होईल, असा अंदाज आहे. एनबीएफसी आणि बँका दर महिन्याला अशा सुवर्ण कर्जाचा सोन्याचा लिलाव करतात. आता एक लाखाहून अधिक थकबाकीदारांच्या सोन्याचा लिलाव १६ फेब्रुवारीला होणार आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याची कर्जे आणि सोन्याच्या लिलावाची वाढती थकबाकी देशाच्या आर्थिक मंदीचे निर्देश देते. कारण कोरोनाच्या काळात लाखो लोकांनि लोकांनी सोने गहाण ठेवून कर्ज घेतले, परंतु पुन्हा उत्पन्न न मिळाल्याने ते फेडणे शक्य होत नाही. मात्र याचा फायदा बँका घेत आहेत.दरम्यान, याबाबत भाजप नेते वरुण गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवताना पुरुषाचा स्वाभिमानही गहाण ठेवला जातो. असे भावनिक ट्विट करत, वरूण गांधी म्हणतात, गेल्या दोन वर्षात महामारी आणि महागाई याचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य भारतीयांचे कंबरडे मोडले आहे. नवीन भारत घडवण्याची हीच दृष्टी आहे का?’ असा प्रश्न देखील त्यांनी या ट्विटद्वारे उपस्थित केला आहे.