संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

सोफ्यात आढळला महिलेचा मृतदेह; डोंबिवलीत खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डोंबिवली – डोंबिवलीच्या दावडी येथील शिवशक्ती नगर येथे एका महिलेचा सोफा सेटमध्ये मृतदेह आढळला आहे. गळा आवळून तिची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस करत आहेत.

डोंबिवली पूर्व येथील दावडी मधील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी बी विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे सकाळी कामावर गेले. त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मुलगा दुपारी साडे बारा वाजता शाळेत गेला होता. संध्याकाळी किशोर हे कामावरुन घरी परतले. पत्नी घरात नव्हती. त्यांनी तिचा शोध घेतला. ती कुठेही आढळून आली नाही. मित्र मंडळी नातेवाईकांसह सगळीकडे विचारपूस केली होती. तरी कुठेही सापडली नाही.

पत्नी कुठेही सापडली नाही म्हणून किशोर यांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठलं. दरम्यान, किशोर यांचे शेजारी आणि नातेवाईक त्यांच्या घरी गेले. त्यांचा सोफा विचित्र अवस्थेत दिसत होता. त्यामुळे त्यांनी सोफा तपासला असता त्यात सुप्रिया यांचा मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत सापडला.

दरम्यान, तिची हत्या का झाली याबाबत पोलीस शोध घेत आहेत. सुप्रिया हिचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेऊन पोलिसांकडून विचारपूस सुरु आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami