संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

सोमय्यांकडून महाविकास आघाडीतील “डर्टी डझन” नेत्यांची यादी जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील १२ भ्रष्टाचारी नेत्यांच्या नावाची यादीच आज किरीट सोमय्या यांनी जाहीर केली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय राऊत यांच्या नावाचा समावेश आहे.

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कोणाचा नंबर या प्रश्नावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, आता कोणाचा नंबर हे पाहण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी चिट्ठी काढावी. आणि कोणाला आधी तुरुंगात पाठवायचे हे त्यांनीच ठरवावे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे आंदोलन सुरु केले आहे, त्याबद्दल बोलताना सोमय्या यांनी सांगितले की हे लोक किती वेळा असे आंदोलन करणार आहेत. आपण आजच महाविकास आघाडीतील डर्टी डझन नेत्यांची यादी जाहीर केली असून त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, सुजित पाटकर, सेनेच्या खासदार भावना गवळी, परिवहन मंत्री अनिल परब, आनंदराव अडसूळ, हसन मुश्रीफ, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami