संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

‘सोयरिक’मधून नितीश आणि मानसी एकत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

‘सोयरीक’ जुळणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना. आणि ती कधी? कुठे? आणि कशी जुळेल? या सुद्धा नशीबाच्या आणि योगायोगाच्या गोष्टी असतात. कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. लग्न ठरवण्याच्या, करण्याच्या आणि ‘निभावण्याच्या’ ठरलेल्या पारंपरिक चौकटी मोडून आपल्या पसंतीला प्राधान्य देत लग्न जुळवण्याकड़े आणि त्याबाबत बंधनं असू नयेत, असा विचार करणारी आजची जनरेशन आहे. ‘लग्न हा विषय आमचा वैयक्तिक आहे’, असं नवी पिढी स्पष्टपणे म्हणू लागली आहे. यावर प्रभावी भाष्य करणारा मकरंद माने दिग्दर्शित ‘सोयरीक’ हा चित्रपट ११ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेल्या ‘सोयरीक’ या आगामी मराठी चित्रपटात नितीश चव्हाण आणि मानसी भवाळकर ही नवी जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. आजवर आपल्या चित्रपटांतून समाजातील वेगवेगळे विषय मार्मिकपणे मांडणाऱ्या लेखक-दिग्दर्शक मकरंद माने यांची ही कलाकृती नातेसंबधातील मंथन घडवणारी आहे. विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने यांची निर्मीती असलेल्या ‘सोयरीक’ चित्रपटात शशांक शेंडे, किशोर कदम, छाया कदम, उमेश जगताप, राजश्री निकम, शंतनू गंगणे, विराट मडके, प्रियदर्शनी इंदलकर, विनम्र भाबल, निता शेंडे, योगेश निकम, अतुल कासवा, संजीवकुमार पाटील, अपर्णा क्षेमकल्याणी  आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘सोयरीक’ चित्रपटाच्या निमित्ताने अनेक नावाजलेल्या कलाकारांना एकत्र पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. उत्तम संहिता, दर्जेदार अभिनय आणि वेगळी दिग्दर्शकीय शैली यामुळे एक चांगली भट्टी जमून आली आहे.

लग्नाविषयी, त्यापेक्षाही सहजीवनाविषयी आजची तरुणाई जास्त प्रॅक्टिकली विचार करतेय. पण, या व्यावहारिकतेमध्ये व्यक्तिस्वातंत्र्य किती जपलं जातंय, एकमेकांच्या अपेक्षांचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करण्याएवढी परिपक्वता खरंच आली आहे का? हे देखील पहाणं गरजेचं आहे’, असं दिग्दर्शक मकरंद माने सांगतात.

 ‘सोयरीक’ किंवा ‘लग्न जुळवणे’ ही कुटुंब प्रवाहाला वळण देणारी घटना असते. ‘समाजाच्या दोन आर्थिक स्तरांच्या विचारपद्धतीत बहुतांशी वेळा फरक दिसून येतो. एकीकडे स्वाभिमानाला जपणारी, जातीपातीचा विचार करून आपल्या समाजाशी एकनिष्ठ राहू पाहणारा वर्ग तर दुसरीकडे समाजातील आपली प्रतिष्ठा,ऐश्वर्य,उच्च-नीचता याला प्राधान्य देत संबध जोडणारी मंडळी यांचा संघर्ष घडताना आपण पहातो, अनुभवतो. ‘सोयरीक’ जोडताना या भावना प्रकर्षाने आपल्यासमोर येतात. मुलामुलांच्या आवडीनिवडीचा विचार न करता, आपल्या सोयीनुसार जोडलेली ‘सोयरीक’ अनेक समस्यांना जन्म देते. ‘सोयरीक’ चित्रपट याच विषयाला आपल्यासमोर प्रभावीपणे मांडतो.

‘सोयरीक चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी तर संकलन मोहित टाकळकर यांचे आहे. वैभव देशमुख यांच्या गीतांना विजय गवंडे यांचे संगीत आहे. अजय गोगावले यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami