संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

सोलापूरच्या किरण नवगिरेची भारतीय क्रिकेट संघात निवड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर, प्रतिनिधी- सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मिरे येथील किरण नवगिरे हिची भारताच्या महिला क्रिकेट संघात इग्लंड दौर्‍यातील टी-20 सामन्यासाठी निवड झालेली आहे. अनघा देशपांडे नंतर भारतीय संघात स्थान मिळवणारी किरण सोलापुरची दुसरी खेळाडु आहे.

प्रतिकुल परिस्थितीतुन श्रीपुरच्या चंद्रशेखर विद्यालयात शिकत विविध क्रीडा स्पर्धा गाजवत पुढे पुणे विद्यापिठाच्या महिला क्रिकेट संघ, तसेच नागालँड, अरुणाचल प्रदेशकडुन खेळत सराव, सातत्य यातुन भारतीय महिला संघात किरण नवगिरे हिने स्थान मिळवले आहे. किरणचे हे यश आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने किरणला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami