संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

सोलापूरमध्ये मालगाडी घसरली
रेल्वेचे डबे थेट शेतात घुसले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर – सोलापूर येथून पुण्याकडे निघालेली सिमेंटची मालगाडी आज पहाटे ३ च्या सुमारास करमाळा तालुक्यातील केम रेल्वे स्थानकाजवळ रूळावरून घसरली. मालगाडीची २ इंजिन आणि ३ डबे रुळावरून घसरले. त्यात कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सोलापूर येथून पुण्याकडे सिमेंटच्या गोणी घेऊन मालगाडी जात होती. आज पहाटे ३ च्या सुमारास करमाळाजवळच्या केम रेल्वे स्थानकाजवळ ती आली. तेव्हा तिची २ इंजिन आणि ३ डबे रुळावरून घसरले. मालगाडी वेगात असल्याने इंजिन थेट रेल्वे शेजारच्या शेतात गेली. अपघातात कोणी जखमी झालेले नाही. मात्र रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. मालगाडीची घसरलेली इंजिन शेतातील मातीत रुतली आहेत. अपघाताचा कोणताही परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला नाही, असे मध्य रेल्वेच्या प्रशासनाने सांगितले. ब्रेकमध्ये बिघाड झाल्यामुळे अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami