मुंबई:- झोपेत घोरणे ही समस्या अनेकांना असते. तुमच्या आमच्या घरात असा एकतरी व्यक्त असतो तो झोपेत घोरतो. मात्र या अशा घोरण्यावर उपाय म्हणून तोंडावर चिकटपट्टी लावणे मात्र हा ट्रेंड सध्या चर्चेत आहे. या ट्रेंडला माउथ टेपिंग असे नाव देण्यात आले आहे. या ट्रेंडविषयी तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. तज्ज्ञ म्हणतात की हे हा भयानक प्रकार आहे. असा प्रकार केल्यास श्वास घेण्यास त्रास होणे, अॅलर्जी, चिकटपट्टीमुळे ओठांची जळजळ होऊ शकतो. माउथ टेपिंग असे ट्रेंडचे नाव असून, त्यानुसार नेटिझन्स तोंडाला चिकटपट्टी लावून झोपत आहेत. तोंडाला चिकटपट्टी लावल्याने झोप चांगली लागते आणि घोरण्याची समस्या दूर होते, असा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर असे ट्रेंड अनुकरण करताना जरा विचार करा. या ट्रेंड्समुळे आपले आरोग्य बिघडू शकते.