संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

स्कूल बसच्या भाड्यात 10 टक्के वाढीची शक्यता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मागील काही दिवसांपासून सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने स्कूल बस ओनर्स असोसिएशनने दिवाळीनंतर विद्यार्थ्यांसाठीच्या बस भाड्यात 10 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यामुळे दिवाळीनंतर बसच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे.

स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अनिल गर्ग यांनी म्हटले की, सीएनजीच्या किमतीत 30 रुपयांनी वाढ झाली आहे आणि 4 ऑक्टोबरच्या ताज्या वाढीमुळे किंमत 86 रुपये प्रति किलो पोहोचली आहे. यामुळे ऑपरेशनल कॉस्टमध्ये वाढ झाली आहे. म्हणून स्कूल बसची फी किमान 10 टक्के वाढवावी, अशी मागणी केली आहे. जर ही मागणी मान्य झाली तर, अतिरिक्त मासिक शुल्काचा बोजा किमान 200 रुपये प्रति महिना असू शकतो. पालकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. अर्ध शैक्षणिक वर्ष संपल्याने भाडेवाढ झाली तरी फार काही करता येणार नाही. अशा अचानक वाढीला ब्रेक लावण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शाळांनी भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत पालकांनी व्यक्त केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami