संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

स्टारबक्सचे सीईओ भारतीय वंशांचे लक्ष्मण नरसिंहन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई: – जगप्रसिध्द कॉफी ब्रॅण्ड स्टारबक्सच्या सीईओपदी भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहनल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नरसिंहन १ ऑक्टोबर रोजी कंपनीत रुजू होणार आहेत,हॉवर्ड शुल्त्झ एप्रिल २०२३ पर्यंत अंतरिम प्रमुख म्हणून कार्यरत राहतील.स्टारबक्स ही अमेरिकेतील मोठी कंपनी आहे. साखळी पद्धतीने ती भारतासह अनेक देशात विस्तारलेली आहे. लक्ष्मण यांच्या निवडीमुळे भारताची मान आणखी उंचावली आहे.
55 वर्षांचे लक्ष्मण यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले होते. . पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील लॉडर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी जर्मन आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या द वॉर्टन स्कूलमधून फायनान्समध्ये एमबीए केले आहे. पेप्सिकोमध्ये ग्लोबर चिफ कमर्शिअल ऑफिसर म्हणून अनेक लीडरशीपसंबंधी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami