संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

स्टार स्पोर्टसचे मराठीतूनही प्रक्षेपण करा! मनसेची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मराठी भाषेच्या मुद्यावरुन कायम आक्रमक असणारी मनसे आता स्टार स्पोर्टस चॅनेलवर आक्रमक झाली आहे. स्टार स्पोर्ट्सवर ज्याप्रकारे इतर भाषांमध्ये प्रक्षेपण केले जाते, तसेच मराठीतूनही करण्यात यावे या मागणीसाठी मनसेने काल आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर स्टार स्पोर्ट्स चॅनेलच्या अधिकार्‍यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. पण यंदाही स्टार स्पोर्ट्सवर मराठीतून प्रक्षेपण होणार नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या दूरसंचार सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर यांच्या नेतृत्त्वाखाली काल 14 ऑक्टोबर रोजी स्टार स्पोर्ट्स्च्या लोअर परेल येथील कार्यालयात मोर्चाचे आयोजन केले गेले होते. त्याचबरोबर स्टार स्पोर्ट्सला अल्टीमेटमही देण्यात आला होता. त्यानंतर सतीश नारकर यांनी स्टार स्पोर्ट्स अधिकारी आणि राज ठाकरे यांच्या भेटीबद्दलची माहिती दिली. या भेटीवेळी मनसेच्या दूरसंचार सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर, महासचिव निर्मल निगडे, प्रमोद मंधारे, दिनेश वटवे, संतोष पगारे, सचिव आशिष गावडे, विशान साहनी, सलीम पागरकर, अभय पारकर असे बरेचजण उपस्थित होते. ज्यांनी विविध मुद्दे समोर ठेवले. त्यामुळे आता इतर भाषांप्रमाणे टी-20 विश्वचषक क्रिकेट सामन्याचे मराठीतूनही प्रक्षेपण होईल, अशी आशा मनसेला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami