संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

स्पाइसजेटने ८० वैमानिकांना धाडले ३ महिन्यांच्या बिनपगारी रजेवर !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

खर्च कमी करण्यासाठी अचानक घेतला निर्णय

नवी दिल्ली- देशात एकीकडे बेरोजगारी वाढत आहे, तर दुसरीकडे कंपन्यांना तोट्यात जात आहेत. या परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांना बीन-पगारी काम करावे लागत आहे. कंपनी तोट्यात असणे आणि कर्मचाऱ्यांना विना-पगारी काम करणे हे चित्र एअरलाईन्स कंपन्यांमध्ये नेहमीचे झाले आहे. एअरलाइन कंपनी स्पाइसजेटने तर सुमारे ८० वैमानिकांना अचानक तीन महिन्यांच्या पगाराशिवाय रजेवर पाठवले आहे. विमान कंपन्यांनी आपला खर्च कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. स्पाइसजेट गेल्या चार वर्षांपासून सातत्याने तोट्यात आहे. डीजीसीएच्या आदेशानंतर, एअरलाइन्स जुलैपासून ५० टक्क्यांहून कमी उड्डाणे केली जात आहेत.
स्पाइसजेटकडे सध्या ९० फ्लाइट्स आहेत. सध्या फक्त ५९ विमान कंपन्या दररोज कार्यरत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पाइसजेटने बी ७३७ विमानाचे ४० पायलट आणि क्यू ४०० चे ४० पायलट तीन महिन्यांच्या रजेवर पाठवले आहेत आणि या वैमानिकांना या तीन महिन्यांचा पगार दिला जाणार नाही. खर्च तातडीने कमी करण्याच्या उद्देशाने विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.स्पाइसजेटने सांगितले की,२०१९ मध्ये बीएमएएक्स विमानाचे ग्राउंडिंग झाल्यानंतर, एअरलाइनने ३० विमानांचा ताफ्यात समावेश केला होता.बी एमएएक्स पुन्हा उड्डाण करण्यास सुरुवात करेल असा विचार करून एअरलाइन्सने वैमानिकांची भरती करणे सुरू ठेवले. परंतु बी ७३७ एमएएक्स च्या सतत ग्राउंडिंगमुळे, स्पाइसजेटमधील पायलटची संख्या जास्त झाली. त्यानंतर आता खर्च कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, ते कधीही कोणत्याही कर्मचार्‍याला कामावरून काढून टाकत नाहीत, हे त्यांचे धोरण आहे. कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी हे धोरण पाळले होते.एअरलाइन्स लवकरच एमएएक्स विमाने सामील करेल, त्यानंतर या वैमानिकांना कामावर परत बोलावले जाईल. स्पाइसजेटला २०२१-२२ मध्ये १७२५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, जो २०२०-२१ मध्ये ९९८ कोटी रुपये होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami