संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

स्मार्ट फोनवर चित्रित झालेला पहिला मराठी सिनेमा; ‘पाँडीचेरी’चा ट्रेलर प्रदर्शित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पाँडीचेरी. दूरवर पसरलेले अथांग समुद्रकिनारे, फ्रेंच धाटणीची रंगीबेरंगी घरे आणि तेथील निसर्गसौंदर्य. कोणाही पर्यटकाला सहज भुरळ पडेल, असे हे रम्य ठिकाण. याच पाँडीचेरीमध्ये घडणार आहे आगळीवेगळी कथा. ‘गुलाबजाम’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे सचिन कुंडलकर ‘पाँडीचेरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पाँडीचेरी सारख्या सुंदर निसर्गरम्य शहरात घडणारी मराठी माणसाची गोष्ट आहे. नवीन पिढीच्या नात्याचे प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा असून विस्थापित झालेले लोक कोणत्या पध्दतीची नाती निर्माण करतात, यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. एकंदरच नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात सई, वैभव आणि अमृता यांच्या नात्याचा नवीन प्रवास आपल्यासमोर उलगडणार आहे. या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिला चित्रपट आहे, जो संपूर्ण स्मार्ट फोनवर चित्रित करण्यात आला आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत या चित्रपटासाठी सचिन कुंडलकर यांनी तिहेरी भूमिका साकारली आहे, दिग्दर्शनासोबतच त्यांनी लेखनाची आणि निर्मात्याची धुराही सांभाळली आहे. याव्यतिरिक्त नील पटेलही या चित्रपटाचे निर्माता आहेत. मोह माया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami