बर्मिंगहॅम- राष्ट्रकुल स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी-20 क्रिकेट सामन्यात स्मृती मंधानाचे धडाकेबाज अर्धशतक आणि भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा यामुळे भारताने पाकवर 8 गडी राखून
विजय मिळविला. पावसामुळे व्यत्यय आल्याने 20 ऐवजी 18 षटकांचा सामना खेळविण्यात आला होता. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. कारण दुसर्याच षटकात भारताच्या स्नेहा राणा हिने पाकिस्तानची सलामीची फलंदाज इशा जावेद हिला शून्यावर पायचीत केले. त्यानंतर पाकची कर्णधार मेहरुफ हिने दुसरी सलामीची खेळाडू मूंकेबा अली हिच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तिलाही स्नेहा राणाने 17 धावांवर पायचीत केले.
मधल्या फळीतील ओमिमाशोहेब 10 धावांवर धावचीत झाली. आयेशा नसीम हिलाही खेळपट्टीवर अधिक वेळ उभे राहता आले नाही तिला रेणुका सिंगने 10 धावांवर बाद केले. आलीय रियाझ हिने 18 धाव केल्या.पण मेघनाच्या अचूक थ्रोवर ती धावचीत झाली. त्यानंतर पाकच्या तालाच्या फलंदाज झटपट बाद झाल्या माजी कर्णधार फातिमा सना 8, फातिमा इम्तियाझ 2, डायना बेग 0 आणि तुंबा हसन 1 या ना भारतीय गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक बाद केले आणि अशा तर्हेने पाकिस्तानचा डाव 18 शतकात 99 धावत संपुष्टात आला. त्यानंतर स्मृती मंदाना हिने नाबाद 63 धावा करून भारताला पाकवर 8 गडी राखून विजय मिळवून दिला.