संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

स्वामी प्रसाद मौर्य आणि राजू दास यांच्यात टीव्ही डिबेटमध्ये हाणामारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनौ : समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सध्या वाद पेटला आहे. रामचरितमानस बकवास आणि दलितविरोधी आहे, असे विधान केल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य हे सध्या चर्चेचा विषय आहेत. यासाठी ते एका टीव्ही कार्यक्रमात आले होते. मात्र आधीपासूनच उपस्थित असलेल्या राजू दास परमहंस यांच्याशी त्यांचे शाब्दिक वाद झाले. ते थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याचा प्रकार घडला आहे.

रामचरितमानसबाबत केलेल्या वक्तव्यावरुन स्वामी प्रसाद मौर्य आपली भूमिका मांडत होते. यावेळी टीव्ही चॅनेलवरील चर्चेच्या कार्यक्रमादरम्यान त्यांचा महंत राजुदास यांच्यासोबत वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी कसेबसे प्रकरण शांत केले आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

या सर्व प्रकारानंतर महंत राजू दास, महंत परमहंस दास आणि त्यांच्या समर्थकांनी लखनऊमध्ये तलवारी आणि कुऱ्हाडीने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्वामी प्रसाद मौर्य यांनी लखनऊ पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केला आहे. या तक्रारीत त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मला लखनऊच्या ताज हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते. मात्र यावेळी माझ्यावर तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. या टीव्ही चॅनेलचा अँकरही या कटात सहभागी होता,” असा आरोप स्वामी प्रसाद मौर्य यांनी या पात्रात केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या