संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

स्वित्झर्लंड 1 ऑक्टोबर रोजी शाकाहारी दिवस पाळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

स्वित्झर्लंड – लोकांना निरोगी जीवनशैलीचे पालन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि पृथ्वीवरचे समोतोल कायम राखण्यासाठी स्वित्झर्लंड 1 ऑक्टोबर रोजी ‘स्विसस्टेनेबल व्हेजी डे’ पळणार आहे. त्या दिवशी सर्व हॉटेलमध्ये केवळ शाकाहारी अन्न मिळणार आहे. 1 ऑक्टोबर 2022 रोजी बिझनेस क्लास प्रवाश्यांना फक्त शाकाहारी जेवण देऊन व्हेजी डे मध्ये स्विस सहभागी होईल. एडलवाईस, मॅकडोनाल्ड चेनची सर्व रेस्टॉरंट्स (173) आणि स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी झुरिच ची 14 रेस्टॉरंट्स देखील त्यात सहभाग घेणार आहेत. 1200 हून अधिक स्थानिक रेस्टॉरंट्स आणि हॉटेल एक दिवसासाठी फक्त शाकाहारी मेनू ऑफर करून हा ‘व्हेजी डे’चा प्रयत्न यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मुख्य पोषण आणि पर्यावरणीय-संशोधनाच्या अनेक वर्षांपासून केलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की आपल्या ग्रहाची शाश्वतता वाढवण्यासाठी शाकाहारी आहार महत्त्वाचा आहे. जितक्या जास्त कंपन्या त्यात सहभागी होतील तितका जास्त परिणाम होतो. स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभ्यासानुसार, जर स्वित्झर्लंडमधील प्रत्येकाने आठवड्यातून फक्त एक दिवस शाकाहारी अन्न खाल्ले तर आपण केवळ एका वर्षात 3.7 अब्ज किलोमीटर कार उत्सर्जनाची बचत करू शकतो 2020 मध्ये, स्विस लोकसंख्येने मागील वर्षाच्या तुलनेत 52 टक्के अधिक वनस्पती-आधारित मांस पर्याय विकत घेतले आणि ही संख्या दरवर्षी वाढतच जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami