पुणे – पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण परिसरात आज स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन हा अपघात घडला. यात तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. संदीप राजाभाऊ माळी (३५), बालाजी केरबा तिडके (४८) आणि सरस्वती राजाभाऊ माळी (६१) अशी मृतांची नावे असून हे तिघे लातूर जिल्ह्यात राहात होते.
पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर – पुणे या लेनवर इंदापूर तालुक्यातील डाळज गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. हे दुर्दैवी घटना आज पहाटे ३:४५च्या सुमारास घडली. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भिगवण बस स्थानकाजवळील उतारावर पलटी झाली. यात प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. चंद्रकांत रामकिशन गवळी (५४) असे जखमींचे नाव असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.