वसई- युवा विकास संस्था संचालित स्व. फ्रान्सिस मनु डाबरे स्मृती पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.यामध्ये मॅलकम एलायस डायस यांना भुईरत्न पुरस्कार दिला जाणार आहे.विशिष्ट क्षेत्रात अतुलनीय,अपूर्व आणि आदर्शवत कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.येत्या रविवारी १६ ऑक्टोबर रोजी युवा विकास संस्था सभागृह भुईगाव येथे सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना गौरवण्यात येणार आहे.
तर इतर पुरस्कारांमध्ये लॅरिसा रॉकी आल्मेडा यांना युवा आदर्श पुरस्कार, रेचल कॅरल आल्मेडा यांना आदर्श पुरस्कार (शैक्षणिक क्षेत्र) जाहीर करण्यात आला आहे.मागील वर्षापासून एखाद्या विशिष्ट क्षेत्रात अतुलनीय आणि आदर्शवत कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी स्व.फ्रान्सिस मनु डाबरे स्मृती भुईरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. रोख रक्कम रुपये ११ हजार, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन पुरस्कारार्थींना दरवर्षी स्व. फ्रान्सिस मनु डाबरे स्मृती युवा आदर्श पुरस्काराने गौरवण्यात येते.रोख रक्कम रुपये ५ हजार, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.