मुंबई- ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊतांनी विधानमंडळाला चोरमंडळ म्हटल्यावरून त्यांच्यावर दाखल केलेल्या हक्कभंग प्रस्तावासह अनेक प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी गठीत झालेल्या हक्कभंग समितीची बैठक आज सकाळी विधानभवनमध्ये झाली.
समितीचे सदस्य संजय शिरसाठ यांनी सांगितले की, हक्कभंग समिती स्थापन झाली आहे. पुढील 9 मार्चला बैठक आयोजित केली आहे. समितीच्या या बैठकीत जे विषय प्रलंबित आहेत, त्यांच्यावर चर्चा होईल. त्यानंतर सुनावणी सुरू होईल. त्यात संजय राऊत यांचे प्रकरण देखील असेल, आम्ही खासदार संजय राऊत यांना नोटीस दिली होती. मात्र या संबंधीचा अधिक तपशील आपण गोपनीयतेच्या कारणामुळे देऊ शकत नाही,` दरम्यान राऊतांना नोटिसाला आज संध्याकाळपर्यंत उत्तर देणे बंधनकारण होते. मात्र त्यांना कोणतेही उत्तर समितीला दिले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा स्मरण पत्र पाठवले जाईल. राऊतांच्या हक्कभंगासंदर्भात समिती कोणते पाऊल उचलणार, यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.