संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

हजला गेलेल्या ३०० मुस्लिमांना सौदी अधिकऱ्यांकडून अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रियाध : या आठवड्यापासून हज यात्रेला सुरुवात होणा आहे. ज्यांना परवाने मिळाले नाहीत, त्यांनी या यात्रेत सहभागी होऊ नये अशा आधीच सूचना दिलेल्या असताना, आता सौदीने परवानगी नसलेल्या यात्रेकरूंवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून, ३०० मुस्लिमांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियात या आठवड्यापासून हज यात्रेला सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीनंतर सुरू झालेल्या या प्रवासाबाबत आखाती देशाने आधीच सांगितले होते की, परवाने नसलेल्या यात्रेकरूंना अटक करून दंड आकारला जाईल. आता सौदीने परवानगी नसलेल्या यात्रेकरूंवर दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. परवानगीशिवाय हज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे ३०० जणांना सौदी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

परवान्याशिवाय हज करणार्‍यांच्या अटकेला एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. या सर्वांना दंड ठोठावण्यात आला आहे. हज सुरक्षेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मोहम्मद अल-बासामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “हज नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल २८८ नागरिक आणि रहिवाशांना अटक करण्यात आली आहे.” नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना प्रत्येकी १० हजार सौदी रियाल अंदाजे २ लाख १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बासामी म्हणाले की, या प्रकरनांमुळे इस्लामच्या पवित्र शहर मक्काभोवतीही सुरक्षा कडक करण्यात आली आहे. या वर्षी केवळ १० लाख लोकांना हज यात्रेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami