हरभजन सिंगने अंधेरीतील घर १७.५८ कोटींना विकले

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने अंधेरीच्या रुस्तमजी एलेमेंट्समधील ९व्या मजल्यावरचे आपले घर १७ कोटी ५८ लाखांना विकले. हा व्यवहार १८ नोव्हेंबर २०२१ रोजी झाला. ते २,८३० चौरस फुटांचे आहे.

भारतीय संघातील फिरकी गोलंदाज हरभजन सिंग अनेक वर्षे भारतीय संघात खेळत होता. त्याने अजून अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. त्याने मुंबईतील अंधेरी येथील रुस्तमजी एलिमेंट्सच्या नवव्या मजल्यावर २,८३० चौरस फुटांचे अपार्टमेंट डिसेंबर २०१७ मध्ये विकत घेतले होते. मार्च २०१८ मध्ये त्याने त्याची नोंदणी केली होती. त्यावेळी ते त्याने १४ कोटी ५० लाखांना खरेदी केले होते. हे अपार्टमेंट त्याने १७ कोटी ५८ लाखांना विकले आहे. त्यासाठी खरेदीदाराने ८७ लाख ९० हजारांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. हरभजन सिंग भारतीय संघातून १०३ कसोटी, २३६ वन-डे आणि २८ टी-२० सामने खेळला आहे.

Close Bitnami banner
Bitnami