संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

हरवलेल्या बोक्याला शोधण्यासाठी सोलापुरात ठिकठिकाणी लावले पोस्टर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर – माणसाने पाळलेला एखादा प्राणी हा कधी कधी त्या कुटुंबातील सदस्य बनून जातो. सोलापुरातील बासूतकर कुटुंबीयांच्या घरातील ‘मन्या’ नावाचा एक मांजर बोका म्हणजे कुटुंबातील सदस्य तीन दिवसांपासून गायब होता.त्यामुळे त्यांनी भिंतीवर पोस्टर चिकटवण्यापासून सोशल मीडियावर आवाहन केले. अखेर तीन दिवसांनंतर या मांजराचा शोध लागला. मात्र या प्रकारामुळे मन्या नावाचा बोका सोलापुरात चांगलाच प्रसिद्ध झाला हे मात्र नक्की!
बासूतकर कुटुंबीयांच्या मन्यावर कुत्र्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात मन्याच्या पोटावर जखम झाली होती. त्यामुळे शहरातील पशुवैद्यकीयतज्ज्ञ डॉ. बबनराव कांबळे यांच्या दवाखान्यात त्याला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले. डॉ.कांबळे यांनीही विलंब न करता मन्यावर उपचार सुरू केले.जखमेला टाके मारण्याशिवाय पर्याय नसल्याने डॉक्टरांनी आधी मन्याला भुलीचे इंजेक्शन टोचले आणि मग टाके मारले.पण तेव्हा निपचित पडलेला मन्या ताडकन उठला आणि पुढच्याक्षणी नखे ओरबाडत दवाखान्यातून पळून गेला. त्यामुळे बासूतकर कुटुंबीयांना अधिकच काळजी वाटू लागली.मन्या हरवल्याच्या रात्रीपासून मन्याच्या शोधमोहिमेस सुरुवात झाली.३ दिवस शोधूनही मन्या सापडला नाही. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला. मन्या हरवलेल्या भागात पत्रके वाटली.अखेर चौथ्या दिवशी कृष्णा कॉलनी सोसायटीत मन्या सापडला आणि बासूतकर कुटुंबियांच्या जिवात जीव आला. एका मांजरप्रेमी कुटुंबाकडून आपल्या पाळीव मांजराची शोधमोहीम यशस्वी झाली आणि त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami