संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

हरिद्वार येथून देशातील पहिली
‘पॉड टॅक्सी’ लवकरच धावणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हरिद्वार – तीर्थनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिद्वार येथून देशातील पहिली पॉड टॅक्सी सुरु होणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय उत्तराखंड सरकारकडून घेण्यात आला. त्यानुसार, या पॉड टॅक्सीचा मार्ग सुमारे २०.७४ किलोमीटरचा असणार आहे.

हरिद्वार येथील वाहतुकीची आधुनिक साधने विकसित करण्यासाठी उत्तराखंड मेट्रो कॉर्पोरेशनने येथे पॉड टॅक्सी चालवण्याचा प्रस्ताव तयार केला. येथील ज्वालापूरच्या टोकापासून भारत माता मंदिर आणि दक्ष प्रजापती मंदिरापासून लक्‍सर रोडपर्यंत एकूण ४ कॉरिडॉर बनवण्यात येणार आहेत. या कॉरिडॉरमध्ये २०.७४ किलोमीटर लांबीचा ट्रॅक तयार करण्यात येणार असून येथे पॉड टॅक्सी चालवल्या जातील. यासाठी उत्तराखंड मेट्रो कॉर्पोरेशनने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. या मार्गावरील प्रमुख स्थानकांमध्ये सीतापूर, ज्वालापूर, आर्य नगर, रामनगर, रेल्वे स्टेशन, हरकी पौडी, खडखडी, मोतीचूर, शांतीकुंज, भारत माता मंदिर, गणेशपुरा मंदिर, जगजीतपूर आणि लक्सर यांचा समावेश आहे.

हा प्रकल्प दीड वर्षात पूर्ण होणार आहे. तसेच यात भूसंपादनाची फारशी गरज भासणार नाही. भारतातील पॉड टॅक्सीचा हा पहिला प्रयोग असणार आहे. यावर अनेक गोष्टी अवलंबून असल्याचे उत्तराखंड सरकारचे अधिकारी सांगतात. याचे यश देशातील उर्वरित शहरांसाठी एक उत्तम उदाहरण ठरणार आहे. तसेच नव्या संकल्पना भारतभर रावबण्यासाठी याची मदत होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या