हावडा स्टेशनजवळील जमीन भारतीय रेल्वे लीजवर देणार 

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

हावडा – आता भारतीय रेल्वेने निधी उभारण्यासाठी हावडा रेल्वे स्टेशनजवळील जमीन ९९ वर्षांच्या लीजवर देण्याची योजना आखली आहे.या जमिनीचा निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारे वापर करता येणार आहे. हुगळी नदीजवळ असलेल्या ८८ हजार ३०० चौरस मीटर जागेची किंमत ४४८ कोटी एवढी ठरवली असून रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने या जमिनी लीजवर देण्यासाठी बोली आमंत्रित केल्या.

हावडा रेल्वे स्टेशनपासून १.५ किमी अंतरावर असलेली जमीन २० मीटर रुंद असलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला आहे. इच्छुक डेव्हलपर्स २९ ऑगस्ट २०२१ पर्यंत आपल्या बोली देऊ शकतात. आरएलडीए विभाग रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. या विभागाचे काम रेल्वेच्या जमिनींचा विकास करणे हे आहे. याची चार प्रमुख कामे म्हणजे व्यावसायिक प्रॉपर्टीला लीजवर देणे, रेल्वे कॉलनीचे रि-डेव्हलपमेंट, स्टेशनचे रीडेव्हलपमेंट आणि इतर अनेक प्रकारच्या वापरासाठी लागणाऱ्या कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्याचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.

Close Bitnami banner
Bitnami