शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी अतिशय कमी वेळेत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर रिटर्स दिले आहेत. टाटा ग्रुपची कंपनी टेलिसर्विसेज लिमिटेड या TTML हे याचे उदाहरण आहे. या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये मागील 2 वर्षात 5800 टक्के वाढ झाली आहे.
मागील 6 महिन्यात TTMLचे शेअर जवळपास 43 रुपयांवरून 180.80 रुपयांवर पोहोचले आहेत. यावेळी जवळपास 320 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. त्याचप्रमाणे मागील एका वर्षात हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक जवळपास 20 रुपयांवरून 180.80 पर्यंत पोहोचला होता. या काळात शेअरमध्ये 820 टक्क्यांची वाढ झाली. तसेच याची किंमत 3.05 रुपयांवरुन 8 फेब्रुवारी 2022 रोजी 180.80 रुपयांवर पोहोचली. यादरम्यान 5800 टक्क्यांची वाढ झाली. म्हणजेच एखाद्या गुंतवणुकदाराने 2 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्या 1 लाख रुपयांचे 59 लाख रुपये झाले असते.
TTML ही टाटा टेलिसर्व्हिसेजची सब्सिडियरी कंपनी आहे. ती आपल्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. कंपनीने मागील महिन्यात कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट बेस्ड सर्व्हिस सुरू केली आहे. याद्वारे कंपन्यांना फास्ट इंटरनेटसह क्लाउड बेस्ड सिक्योरिटी सर्व्हिसेज आणि ऑप्टोमाइज्ड कंट्रोल दिला जातोय. त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.