संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाची चौकशी पूर्ण; ९ फेब्रुवारीला लागणार निकाल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वर्धा – संपूर्ण देशासह राज्य ढवळून काढणार्‍या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी फास्ट ट्रॅक कोर्ट जाहीर करणार असून कोर्टात दोन्ही बाजुचा युक्तिवाद पुर्ण झाला असून या प्रकरणाचा निकाल आज कोर्टाकडून जाहीर होणार होता. मात्र, या खटल्याचा न्यायालयीन कामकाज पूर्ण न झाल्याने आता 9 फेब्रुवारी रोजी कोर्ट आपला निकाल देणार आहे. आता या निकालाकडे पिडित कुटुंबियांसह हिंगणगाटातील लोकांचे लक्ष लागले आहे.

कोरोना वाढत्या प्रादुभावामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबली होती. मात्र 5 फेब्रुवारीला प्रकरणाचा निकाल कोर्ट सुनावणार असल्याचे उज्वल निकमांनी 21 जानेवारीला सांगितले होते. मात्र या खटल्याचे न्यायलयीन कामकाज पूर्ण न झाल्याने आता 9 फेब्रुवारीला कोर्ट निकाल देणार आहे. दरम्यान, पिडीत तरुणी महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून काम करत होती. ती 3 फेब्रुवारीला 2020 ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरून बसला होता. त्याने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवले. यात गंभीररीत्या भाजलेल्या तरुणीेला नागपुरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याता आले. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेतला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami