संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

हिंगोलीमध्ये जैन मंदिरासाठी खोदकाम
करताना १६०० वर्ष जुनी मूर्ती सापडली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हिंगोली – हिंगोली येथील सोनुने गल्लीत जैन मंदिर आहे. ३१ जानेवारी रोजी या परिसरात खोदकाम करताना एक प्राचीन मूर्ती सापडली. ही मूर्ती पाच फूट उंचीची असून ती कुंथूनाथ भगवंताची असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. प्राचीन मूर्ती सापडल्याने जैन समाजातील लोक आनंदी झाले.
नवीन मंदिर उभारण्याचा निर्णय झाल्याने जुन्या मंदिराच्या समोरील परिसरात खोदकाम करण्यात आले. त्यावेळी मंगळवारी सकाळी ८:३० च्या सुमारास खोदकाम सुरु असताना एक मूर्ती सापडली. त्या मूर्तीला स्वच्छ केल्यानंतर मूर्तीबद्दल जैन मुनींकडून माहिती घेण्यात आली. तेव्हा ही मूर्ती कुंथूनाथ भगवंताची असल्याचे जैन मंदिराचे अध्यक्ष तेजकुमार झांजरी यांनी सांगितले. त्यांनतर सकाळी मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. मूर्ती मुख्य मंदिरात तात्पुरत्या स्वरुपात ठेवण्यात आली. यावेळी राजकुमार झांजरी, अनिल झांजरी, अनंत झांजरी व सकल जैन समाज उपस्थित होता. तसेच, ही मूर्ती १६०० वर्ष जुनी असण्याची शक्यता असून पुरातत्व विभागाकडून अधिक माहिती घेण्यात येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या