हिंगोली – हिंगोली जिल्हा पोलिसांच्या श्वान पथकात एक दुख:द घटना घडली आहे.हिंगोली पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांच्या लाडक्या ‘राणा ” नावाच्या श्वानाचे निधन झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून ‘राणा ” हा आजारी होता.त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान राणाचे बुधवारी निधन झाले.
‘राणा ” च्या निधनाबद्दल पोलिसांनी त्याला भावपूर्ण वातावरणात सन्मानपूर्वक श्रद्धांजली अर्पण करत मानवंदना दिली.हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकात मागील १० वर्षे आणि ४ महिन्यापासून राणा कार्यरत होता.राणा हा त्यांच्या श्वान पथकातील एक जबाबदार घटक सदस्य होता.रेल्वे स्टेशन,बस स्टॉप सारख्या वर्दळीच्या ठिकाणी अंमली पदार्थ शोधून काढण्याचे तो काम करत होता.त्याच्या कामावर पोलिसांचा अढळ विश्वास होता.