संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

हिंदुस्थानी भाऊला आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घ्या या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना भडकविणे हिंदुस्थानी भाऊला चांगलेच महागात पडले आहे. हिंदुस्थानी भाऊला उद्या 5 फेब्रुवारीपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हिंदुस्थानी भाऊ याला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याची पोलीस कोठडी संपत असल्याने धारावी पोलिसांनी त्याला वांद्रे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी हवी, अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. तसेच हिंदुस्थानी भाऊच्या मागे कोणी राजकीय संस्था आहे का? त्याला आर्थिक मदत कुठून मिळाली याचाही तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. तर आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी गाड्यांची तोडफोड केली. तसेच काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. त्यासाठी हिंदुस्थानी भाऊने न्यायालयात बिनशर्त माफी मागितल्याचे वकिल महेश मुळे यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami