मुंबई- शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केलं आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आज त्यांनी शिवसेना भवनमध्ये राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाले होते. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे या घटनेचा अपमान आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात.
विधिमंडळामध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. विधानसभेत सुरु असलेल्या घडामोडींवर त्यांनी घटनातज्ज्ञांना विनंती केली की जे काही सुरू आहे याबाबत भूमिका स्पष्ट करावी. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या.लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल , तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल .घटना तज्ज्ञांना विनंती आहे आपण घटनातज्ञ आहात. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.