संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 07 December 2022

‘हिकाल’च्या शेअरमध्ये पाच दिवसात 11 टक्क्यांची घसरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हिकाल लिमिटेड ही कंपनी ग्लोबल फार्मा कंपन्या, ऍनिमल हेल्थ कंपन्या, क्रॉप प्रोटेक्शन कंपन्या आणि स्पेशालिटी केमिकल कंपन्यांना इंटरमिडीएट व ऍक्टिव्ह इंग्रिडेंट्स पुरवठा करते. गेल्या 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये अडीच पट वाढ झाली आहे. मार्च 2017 मध्ये तिच्या एका शेअरची किंमत 137 रुपये होती, ती आता 364 रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र गेल्या 5 व्यापार सत्रांमध्ये या शेअरमध्ये कमजोरी दिसून येत आहे. या कालावधीत तो 11 टक्क्यांनी घसरला आहे, तर 2022च्या सुरुवातीपासून आतापर्यंत 31 टक्क्यांनी घसरला आहे.

दरम्यान, हिकालने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 45 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो वार्षिक तुलनेत 12.2 टक्क्यांनी वाढला आहे. या कालावधीत कंपनीचा महसूल वार्षिक 11 टक्क्यांनी वाढून 514.5 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हिकालच्या ऑपरेटिंग महसुलात फार्माचा वाटा 62 टक्के आणि क्रॉप सिक्युरिटीतून 38 टक्के आहे. कंपनीचा फार्मा व्यवसाय सध्या API आणि CDMO मध्ये 50:50 च्या प्रमाणात विभागलेला आहे. तसेच सीडीएमओ व्यवसायातील 20-25 टक्के महसूल पशु आरोग्य विभागातून येतो.

मंगळवारी एनएसईवर हिकालचे शेअर 4.65 टक्क्यांच्या घसरणीसह 364.05 वर बंद झाले. 2022च्या सुरुवातीपासून स्टॉक 31.31 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र गेल्या एका वर्षात, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 133 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami