संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान कोल्हापूरच्या धावपटूचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा : सातारा हिल मॅरेथॉन ही सातारा जिल्ह्यातील एक भव्य अशी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेदरम्यान एका धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुख:द घटना घडली आहे. मृत धावपटू राज पटेल हा कोल्हापूरचा असून तो राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडूसुद्धा होता. या संपूर्ण घटनेमुळे स्पर्धकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
यंदाच्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची स्पर्धा अवघड अशा यवतेश्वर घाटमाथ्यावर ही पार पडते. या स्पर्धेत देशभरातील तब्बल ७५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. देश विदेशातून अनेक स्पर्धक या मॅरेथाॅन मध्ये सहाभागी होतात. मात्र आता या स्पर्धेला गालबोट लागण्याचा प्रकार घडला आहे.मॅरेथॉन स्पर्धा सुरु झाल्यानंतर स्पर्धेच्या परतीच्या मार्गादरम्यान ही दुर्देवी घटना घडली. स्पर्धक सातारा ते कांस रोड आणि पुन्हा कांस रोड ते पोलीस परेड ग्राऊंड अशा परतीच्या मार्गावर होते. अचानकपणे राज याच्या छातीत दु:खायला लागले, त्यामुळे तो त्याठिकाणी जागेवर पडला. घटना घडल्यानंतर त्याला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्नही करण्यात आला पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्याचा मृतदेह सातारा शासकीय रुग्णालय याठिकाणी नेण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात आणि स्पर्धकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami