संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

हृदयद्रावक! भारत दौऱ्यावरील क्रिकेटर मिलरच्या लेकीचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रांची- भारताविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० आणि एक दिवसीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघातील धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर याच्या बाबतीत अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्याच्या चिमुकल्या लाडक्या लेकीचे निधन झाले. मुलीसोबतचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करून त्याने ही माहिती दिली. त्यामुळे त्याचे चाहतेही हेलावले.

भारताविरुद्धच्या टी-२० आणि एक दिवसीय मालिकेच्या सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. २८ सप्टेंबरला त्यांच्यात पहिला सामना झाला. दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज मिलर सध्या फर्मात आहे. लखनऊमधील पहिल्या वनडेत त्याने शानदार शतकी खेळी केली. असे असताना काल सायंकाळी त्याने धक्कादायक पोस्ट केली. आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचे त्याने त्यात म्हटले आहे. त्याच्या या पोस्टने जगभरातील त्याचे चाहते हळहळले. छोट्या लेकीसोबत खेळतानाचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami