संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

“हॅरी पॉटर’ फेम अभिनेते रॉबी कोलट्रन यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

एडिनबर्ग – हॉलीवूडच्या हॅरी पॉटरमधील प्रसिद्ध अभिनेता रॉबी कोलट्रन यांचे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. हॅरी पॉटर मधील रुबेस हॅग्रीड ही त्यांची भूमिका अतिशय गाजली. या भूमिकेला त्यांनी न्याय दिला, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपासून आजारी असलेल्या रॉबीवर स्कॉटलंडच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नाही.
अभिनेते रॉबी कोलट्रन १९९० च्या दशकातील क्रॅकरमधील हेरगिरीच्या भूमिकेमुळे चर्चेत आले. त्यांना ब्रिटिश अकादमी टीव्हीने सलग ३ वर्षे पुरस्कार दिले होते. २००१ ते २०११ मध्ये आलेल्या हॅरी पॉटर फिल्मच्या मालिकेत त्यांनी हॅरी पॉटरच्या मेंटरची भूमिका पार पाडली. त्यांची ही भूमिका अतिशय गाजली. ३० मार्च १९५० रोजी त्यांचा जन्म स्कॉटलंडमध्ये झाला होता. एडिनबर्गमध्ये त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami