मुंबई – मध्य रेल्वेने यापूर्वीच मुंबई ते सुरतकल दरम्यान ६ होळी विशेष चालवण्याची घोषणा केली आहे. दादर आणि बलिया/गोरखपूर दरम्यान ३४ होळी विशेष आणि नागपूर आणि मडगाव दरम्यान १० हॉलिडे स्पेशल गाड्या सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर/मडगाव, पुणे – दानापूर/अजनी/करमळी आणि पनवेल – करमळी दरम्यान अतिरिक्त ३४ होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. पूर्व मध्य रेल्वेने मुंबई आणि जयनगर दरम्यान ६ होळी विशेषची घोषणा केल्यामुळे, या वर्षी घोषित होळी विशेष गाड्यांची एकूण संख्या ९० झाली आहे.