संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

१२० विद्यार्थांना ट्रकमध्ये कोंबले! श्वास गुदमरून अनेकजण बेशुद्ध

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गोंदिया – जिल्ह्यातील मजितपूरच्या शासकीय आदिवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळासाठी घेऊन जाताना शाळेच्या प्रशासनाने एकाच ट्रकमध्ये कोंबून भरले.या आदिवासी शाळेच्या तब्बल १२० मुलामुलींना अक्षरश: कोंबून भरल्याने श्वास गुदमरून अनेक जण बेशुद्ध पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या विद्यार्थ्यांना शाळा प्रशासना खेळण्यासाठी घेऊन जात होते. पण एकाच ट्रकमध्ये १२० मुलामुलींना जनावरासारखे कोंबून ट्रकमध्ये भरण्यात आले. त्यामुळे अनेकांचा श्वास गुदमरून ते बेशुद्ध पडले. शाळेच्या या बेजबाबदारपणामुळे दहा विद्यार्थी- विद्यार्थीनींची प्रकृती खालावली आहे.या विद्यार्थ्यांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला आहे. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली.कोयलारी आश्रम शाळेवरून परतताना हा प्रकार घडला आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर एका मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami