संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

१२ कोटी खर्चूनही सावित्री नदीवरील आंबेत पूल झुकला; वाहतुकीस बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रत्नागिरी – रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा सावित्री नदीवरील पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याआधी या पुलाच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या दुरुस्तीनंतरही पुलाचे खांब झुकल्याने पुन्हा हा पूल बंद करण्यात आला आहे.

हा पूल आधी दुरुस्तीसाठी वर्षभर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा या मार्गावर वाहतुकीला निर्बंध घातले आहेत. आता या पुलाचे खांब पश्चिमेच्या दिशेने झुकले आहेत. वरचा भाग मात्र सुस्थितीत आहे.तरीही खांब झुकल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल रायगड जिल्ह्यातून रत्नागिरीच्या दापोली,मंडणगड आणि खेड या तीन तालुक्यांना जोडला जातो. वाहतूक बंद असल्याने एसटी सेवा सुद्धा ठप्प होणार आहे.यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.परिणामी या सर्वाना महाड मार्गे प्रवास करावा लागणार आहे.अशा या परिस्थितीत या आंबेत पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.तसा प्रस्तावही शासनाकडे पाठविला आहे.मात्र अद्याप तो प्रलंबित आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami