कोल्हापूर – सहकारमहर्षी स्व. विश्वनाथ आण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांच्या २८ व्या पुण्यस्मरणार्थ भारतातील सर्वश्रेष्ठ मल्लयुद्ध-२०२२ अर्थात कुस्ती महासंग्राम मंगळवार १३ डिसेंबर रोजी वारणानगर येथील वारणा विद्यालयाच्या क्रीडांगणावर होत आहे. हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मैदानापैकी एक समजले जाणारे ‘वारणा’ कुस्ती मैदान आहे.
मॅटवरील कुस्तीपेक्षा भारतीय कुस्तीच्या परंपरेला चालना देण्यासाठी लाल मातीवरील निकाली कुस्त्यांचे मैदान प्रतिवर्षी होत असते.यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील इराणच्या मल्लाच्या लढतीसह २४० हून लहान मोठ्या कुस्त्या होणार आहेत.त्यामध्ये प्रथम क्रमांकाच्या जनसुराज्य शक्ती श्री किताबासाठी भारत हिंदकेसरी प्रीतपाल फगवाडा (पंजाब) विरुद्ध हिंदकेसरी उमेश मथुरा (हरियाणा) यांच्यात लढत आहे. दुसऱ्या क्रमांकाची वारणा साखर शक्तीसाठी इराणचा जागतिक विजेता हमीद विरुद्ध भारत हिंदकेसरी प्रवीण कोहली (पंजाब) यांच्यात लढत आहे.मैदानात मुख्य १५ कुस्त्या, ३० पुरस्कृत कुस्त्यांसह २५० वर लहान मोठ्या कुस्त्या होतील. वारणा उद्योग व शिक्षण समूहाकडून मैदानाची जय्यत तयारी सुरू आहे,असे आमदार डॉ. विनय कोरे यांनी सांगितले. यावेळी वस्ताद संदीप पाटील,दिलीप महापुरे आदी उपस्थित होते.
दरम्यान,या महासंग्रामात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) वि. विजय बाबर (उत्तर प्रदेश केसरी),माऊली जमदाडे (गंगावेश कोल्हापूर) वि. विजय (सोनीपत आखाडा) शैलेश शेळके (महाराष्ट्र केसरी) वि.नवप्रीत खन्ना (पंजाबचा राष्ट्रीय विजेता), प्रकाश बनकर (गंगावेश कोल्हापूर) वि. रोहित (पंजाब केसरी) माऊली कोकाटे (राष्ट्रीय विजेता) वि. भाऊ फगवाडा (राष्ट्रीय विजेता, पंजाब)अक्षय शिंदे (राष्ट्रीय विजेता, पुणे) वि. भारत मदने (राष्ट्रीय विजेता, बारामती)वीर गुलीया (दिल्ली) वि. कार्तिक काटे (कर्नाटक), सुनील फडतरे (कर्नाटक) वि. संग्राम पाटील (आंतरराष्ट्रीय विजेता, सेनादल) शुभम सिद्धनाळे (कोल्हापूर) वि. सुदर्शन खोतकर (पुणे), सोनबा गोंगाणे (कोल्हापूर) वि. महेश अंथणी (राष्ट्रीय विजेता),नामदेव केसरे (वारणा) वि.संजय कुमार (हरियाणा)उदय खांडेकर (वारणा) वि.भाविकांना (पंजाब) अशा लढती होणार आहेत.